अश्रूंची झाली...
प्रिय, लहानपणापासून पपांच्या तोंडून ऐकलेलं एक गाणं माझं खास आवडतं, ‘रोते रोते हसना सीखो, हसते हसते रोंना’. खरंच जन्माला आल्यापासून ‘जिवंतपणाचा पुरावा’ म्हणून रडणं आयुष्याचा भाग होतो. भले रडू कुणालाच आवडत नाही. मात्र दु:खाच्या, वेदनेच्या, कोलमडून पडण्याच्या प्रसंगात रडण्याचा खरंतर आधारच होतो व्यक्त व्हायला. जेव्हा काहीच करता येत नाही अशी अगतिक परिस्थिती उद्भवते तेव्हाही अश्रू सोबत करतात. परिस्थितीच्या माऱ्याने, अत्यंत वाईट अनुभवांतून ‘रडणं आटलेली’ माणसं पाहिली की वेळप्रसंगी रडता येणं blessing वाटायला लागतं. रडणं emotional असण्याशी जोडलं गेलं की माणसं पहिला प्रयत्न करतात त्यापासून स्वतःला तोडून टाकायचा. (कदाचित कमकुवतपणाचं लक्षण वाटत असावं म्हणून) मात्र ते केवळ भावनाप्रधान (EMOTIONAL) नसून संवेदनशील (SENSITIVE) असण्याचं ही प्रतिक आहे. पुरुषांना तर रडणे वर्ज्यच जणू. हळवेपणा not allowed! रडण्याला दुःखाची किनार इतकी परफेक्ट बसली आहे वर्षानुवर्ष, की इतर शेकडो प्रसंगी (वाईट सोडून) सुद्धा व्यक्त होण्यासाठी अश्रू तत्पर असू शकतात हे ध्यानात घेत नाही आपण. एखाद्या ...