बोलते मराठी
प्रिय, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं म्हणताना; तेवढंच एक वाक्य नसतं ते. त्यामागे आणखी अनेक गोष्टी असतात ज्या सांगता किंवा मांडताना शब्द अपुरे पडतात. आज माझंही तसंच होत आहे, मराठी भाषेवरच्या प्रेमाबद्दल काहीही म्हणताना! सहसा जन्मजात मिळालेल्या देणग्यांवर मला फार गर्व नसतो. मात्र ‘लाभले मज भाग्य बोलते मराठी’ असं म्हणताना अभिमानाने ऊर भरून येतो. कारण मला मराठी भाषिक असल्याचा खरोखरीच गर्व आहे. विद्यार्थीदशेपासून शिक्षिकेच्या भूमिकेपर्यंत (दरम्यान कॉर्पोरेट सोडता) सगळा प्रवास मराठी माध्यमातून झाल्याने तसंच मला लाभलेल्या शिक्षिका आणि मित्रमंडळ यांच्यामुळे; शिवाय आईवडिलांकडून वाचनाचा वारसा मिळाल्याने माझी मराठी भाषेवर असलेली पकड जरा बरी झाली. आणि मग मला नादच लागला मराठीचा असं म्हंटलं तरी चालेल. बोलताना एकेका शब्दाचा उच्चार, लय, भाषेचा लहेजा हे सगळं खुळावणारं आणि त्यावर प्रभुत्व मिळालं की भाषा आणि संवाद खुलवणारं! भाषा शिकणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असं मला वाटतं, त्यातून ती मराठी सारखी समृद्ध भाषा असल्यास नक्कीच तेवढा वेळ द्यावा लागणार. मी ‘जास्त’ या शब्दाचा उच्चार कॉलेज ...