Posts

Showing posts from April, 2021

दर्शन

  प्रिय, ‘दर्शन’ नाटकाच्या वेळी लेखक शाम मनोहर एका भेटीत म्हणाले होते, ‘एखादी कलाकृती आवडते म्हणजे तिच्यातलं सगळंच आवडलं पाहिजे असं नाही. अख्या नाटकात फक्त एक लयबद्ध गिरकीच लक्षात राहू शकते आणि ते ही नाटकाचं श्रेय ठरू शकतं.’ सांगितलेलं सगळं कळण्याइतकी प्रगल्भता नव्हती; मात्र त्या नंतर ‘दर्शन’च्याच एका प्रयोगात ‘गावातल्या पाणीवाल्या बाईच्या’ भूमिकेत ‘स्वतःच्या आईला पाहीलं’ म्हणून चक्क मला नमस्कार घालायला आलेल्या एका आजोबांच्या कृतीतून बराच अर्थ जुळला. त्यांना नाटकाशी जोडणारं काही असेल तर त्या भूमिकेची वेशभूषा आणि तिचा पाण्यासाठीचा struggle. या नव्या दृष्टिकोनानंतर काहीच ‘टाकाऊ’ नाही राहिलं. कोणतंही गाणं, कविता, पुस्तक, चित्रपट, विषय, अनुभव….काहीच! कधी कशात काय ‘क्लिक’ होऊन जाईल नेम नाही. जसं चित्रपटाच्या बाबतीत एखादाच संवाद किंवा प्रसंग, अगदी expression / feel सुद्धा पुरेसा असतो आवडायला. ‘DDLJ’ केवळ शाहरुखचा... ‘पलट’ वाला सीन आवडतो; म्हणून अनेकदा पाहणारे असतीलच की ओळखीत. तसंच खूप आवडणाऱ्या गाण्यात एखादं कडवंच खरंतर प्रिय असतं. दर्जेदार लिखाण करणाऱ्या साहित्यिकांची ही मोजकीच...