आवर रे , सावर रे
प्रिय, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी पार पडणारा task म्हणजे साफसफाई आणि सफाई म्हणजे केवळ जाळी जळमटी काढणं नव्हे तर शक्य तिथला पसारा आवरणे. ज्यात वापरात नसलेल्या गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखवणं अपेक्षित असतं. मात्र प्रत्यक्ष कामाला लागता होतं भलतंच. घर आवरताना रमायला होतं वस्तूंमध्ये. घर आवरायला घेतलं की काय काय ‘आवरतं घ्यावं’ लागतं नाही! काय नसतं त्यात ! कदाचित एखादा संसार उभा राहील एवढ्या वस्तू कुठेकुठे मांडून ठेवलेल्या असतात. घर म्हणजे कपाट , किचन ट्रॉली , माळे, किचकट स्टोरेज वाले कप्पे आणि खण. त्यात असतात असंख्य गोष्टी. असतं एक घड्याळ, आठवणीतले कपडे शिवाय एक असतं जीर्ण होणारं पत्र, सोबत आठवणीतल्या पुस्तकातलं पिंपाळपान! कधी असतो स्टोव्ह , तशाच असतात ताट-वाट्या,चमचे. म्हणजे Modular kitchen मध्ये फिट बसत नाही , म्हणून back seat वर विराजमान झालेला तत्कालीन संसार! अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि हो, असतातच. ‘होत्या’ किंवा ‘आहेत’ या गटात नाही मोडत हे सगळं. मात्र ‘मोडीत’ ही नाही निघत काही केल्या. गरजपूर्ती साठी घेतलेल्या वस्तू, हौसपूर्ती साठीच्या वस्तूंकडून take over झाल्यावर ‘कप...