कठीण समय येता...
प्रिय, नुकताच एक forwarded मेसेज वाचण्यात आला. शब्दशः सांगत नाही बसत, 2020 हे वर्ष आयुष्यातून डिलीट करण्याबद्दल होता. वाईट आहेच परिस्थिती अर्थात. 100 वर्षात एकदा येणारी situation! खूप काही सोसावं लागत आहे आपल्याला. नको नको झालं आहे आता इतिहासाचे साक्षीदार आणि भागीदार बनणं. पण म्हणून सरळ अख्ख वर्ष वजा करायचं? सततच्या गोड जेवणाने ही कधी मळमळ होते. तिखट, आंबट, तुरट अगदी कडू सुद्धा हवंच असतं की आहार संपूर्ण व्हायला. नुसत्या जेवणातच नाही, आपलं प्रचंड प्रेम असतं अशा आई वडिलांपासून ते नवरा बायको वा भावंडं किंवा प्रियकर प्रेयसी अशा सगळ्या नात्यांमध्ये तरी कुठे सगळं फक्त गोग्गोड असतं? म्हणून माणसं तोडून नाही टाकत आपण. सगळ्यांच्या सोबतीने जगतो आणि त्यामुळेच आठवणी तयार होतात. आयुष्याचंही तेच आहे. ‘कोलाज’च तर असतं ते एक. वेगवेगळ्या भावनांचं, प्रसंगांचं. ‘जगायचं’ असं एकदा ठरलं ना, मग एकसूरी कशाला मागायचं? ‘Colourful life’ हवं म्हणताना एकाच रंगाची अपेक्षा तर नाही करत आपण. धमाल, excitement, आनंद, समाधान, निराशा, हतबलता, असूया सगळं हवं... प्रसंग चांगला असला त...