गोष्ट सांगते ऐका
प्रिय, गोष्ट सांगते ऐका. एक होते चिमणराव आणि एक होत्या चिमणाबाई. चिमणराव आणि चिमणा बाई यांनी काडी काडी जमवून घरटं बांधलं. दरवेळी घरट्याचं काम झालं, की काही न काही संकट यायचं आणि पुन्हा पहिल्याने सुरुवात करावी लागायची. चिकाटीने जगत आलेल्या दोघांना हार मानणं कबूल नव्हतं. बाळकडुच तसं मिळालेलं. मोठ्या कष्टाने एकदाचं बांधलेलं घरटं काही दिवस टिकल्यावर चिमणी म्हणाली, ‘पिल्लाची सोय झाली!’ काही दिवसातच पिल्लं जन्माला आली आणि चिमणा चिमणी आनंदून गेले. मात्र संसारात रममाण होण्याऐवजी आणखीनच चिंतेत पडले. दोघांच्या संवादात नेहमीच ‘आपण उपसलेल्या कष्टाची झळ आपल्या पिल्लांना नको बसायला’ याचा विचार असायचा. मग काय तर, त्यांचा दिनक्रम ठरूनच गेला. चिमणराव जाणार जेवणा खाण्याची सोय करायला आणि चिमणी पिल्लं सांभाळत घरट्यात! पिल्लं आपली मजेत एकदम. घरट्यात राहून सगळंच तर मिळत होतं. कुणा अवांछिताने त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला तरी चिमणी होतीच रक्षण करायला! दिवस मस्त जात होते. चिमणराव आणि चिमणी पण मनातून खुश होते. त्यांच्या पिल्लांना ‘कसलीच झळ पोहोचू न देण्याचं’ त्यांचं स्वप्न जे ...