संकल्प
प्रिय, तर...finally, आपण सगळेच पोहोचत आहोत 2020 च्या official शेवटाकडे! अंधाराकडून प्रकाशाकडे चं feeling आणि hopes उराशी बाळगत. संकल्प करायचे दिवस पण हेच की! स्वतःला संधी देऊन पहायचे दिवस. व्यायाम, डाएट, एखादा छंद जोपासणे... अगणित शक्यता! संकल्पांच्या यादीत थोडी addition टाकावी म्हणते. शिक्कामोर्तब न करण्याचं आणि न करू देण्याचा संकल्प! स्वतःला आणि इतरांना स्वातंत्र्य देण्याचा संकल्प! अगदी एखाद्या वाक्यावरून, ऐकीव माहिती किंवा चक्क केवळ पेहराव पाहून माणसांना आपण सहज divide करतो दोन रंगांत. दोन parameters मध्ये. चांगलं आणि वाईट! ‘Grey’ ही नितांत सुंदर शेड विसरूनच जातो. जाणून लक्षात ठेवावं लागतं, ‘परफेक्ट असं कुणीच नसतं. कुणीच संत नाही आणि कुणीच खलनायक ही नाही. सगळी फक्त माणसं!’ प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला shades असतातच. म्हणून शिक्का नको वाटतो. मिळायला हवं प्रचंड positive विचारांच्या व्यक्तीला क्वचित negative असण्याचं, सदैव शहण्यासारखं वागणाऱ्या माणसाला वेड्यासारखं वागण्याचं स्वातंत्र्य. तसंच जबाबदारीच्या जोखडाखाली दबून गेलेल्याला, कधीतरी बे...