श्रीमंतीचं लेणं

 प्रिय,


Work from home मुळे मोबाइल मधला internet चा pack पुरेना झाला आणि घराघरात Wi-Fi आले. कुठे एक GB महिनाभर पुरवून वापरणारे आपण... 4 GB दिवसाला पुरेना होईपर्यंत मजल गाठली. आणि हळूच त्यात पण speed ची चैन परवडणे शक्य आहे कळताच वायफाय धारी झालो. मला तर एकदम श्रीमंतीचं feeling आलं!

गेल्या काही महिन्यांत दुर्दैवाने अनेकांची जेवणाखाण्याची परवड होत असताना आपल्या घरात किराणा पूर्ण भरलेला असणं, (वेगवेगळ्या recipes करता येण्याइतका) हेही श्रीमंतीपेक्षा कमी नव्हतं!

टीव्ही वरच्या चॅनेल्स मध्ये भर पडत असताना कार्यक्रमांचे पर्याय वाढले. वेब सिरीज म्हणजे काय याबद्दल educate होतच होतो सगळे, की एकामागे एक सिरीजच नाही तर online streaming services (Netflix, Amazon, Hotstar वगैरे) ची लाट आली. Entertainment unlimited. पुन्हा श्रीमंती!

अभावातून बाहेर येताना कोणतीही गोष्ट प्रभावी वाटत असावी नाही का? त्याची चैन करण्यात मजासुद्धा. जसं स्वयंपाकघरात, कांदे संपत आले की पुरवून वापरले जातात आणि शिंकाळं (मॉडर्न) भरलं कांद्याने की काटकसरीच्या आठवणीने, भाजी सोबत ‘भजी’ पण होतात कांद्याची! तेच पाण्याच्या साठया बद्दल. कमी असताना पेलाभर पण वाया जाऊ दिलं जात नाही आणि तुडुंब असताना वाहत्या नळाशिवाय काम उरकत नाही. अभावाचा प्रभाव आणि feeling सधन असल्याचं! श्रीमंती!

यादी मोठी होत राहील प्रत्येकाची. चैनीच्या वस्तूंपासून गरजेच्या वस्तूंपर्यंत काही गोष्टींचं घबाड हाती लागल्याचा आनंद वेगळाच असतो. पैसा, वेळ, आरोग्य, पुस्तकं, knowledge आणि अनेक खजिन्यांसोबत प्रसंगी आपल्याला हवी ती माणसं आजूबाजूला असणं हे ही श्रीमंतीपेक्षा कमी खचितच नाही! छोट्या छोट्या कारणांमध्ये मनोमन ऐष करणंही श्रीमंतीच! तर मग घेत राहू अशाही श्रीमंतीत लोळण. चालतंय ना?

कळावे,

आनंदमयी


Comments

  1. खरं आहे...गेल्या काही महिन्यात आयुष्य साध्य सोप्या पद्धतीने (without luxury) आनंदात जगायला शिकवले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट