रंगांतर
प्रिय, कॅलेंडर वरून दरवेळी नजर फिरते तेव्हा, त्यावरची Glow & Lovely ची जाहिरात पाहूनसुद्धा माझ्या चेहऱ्यावर glow येतो. Fair & Lovely ने नाव बदलून Glow & Lovely केलं याचा मला मनापासून आनंद झाला. कोणतंही क्रीम चेहऱ्याचा रंग बदलणार नसतं. तरी जेव्हा ते खास गोरी कांती मिळवण्याचं आमिष दाखवून विकलं जातं तेव्हा मन खट्टू होतं. आपल्यावर प्रेम करणारी माणसं रंगावरून जोखत नाहीत आपल्याला. दिसण्याच्या पलीकडे जाऊन असण्यावर जीव लावतात. मात्र आजूबाजूचं बरंच काही बिंबत रहातं नकळत. जसं, ‘वधू पाहिजे’ च्या जाहिरातीत, मुलगी गोरी हवी असते. गाण्यात गोरे गोरे गाल किंवा गोरीपानच वहिनी लागते. अप्रत्यक्षपणे सौंदर्याचा ‘गोरेपणा’ हाच मापदंड मनावर ठसत राहतो. जो एखाद्याचा स्वतःकडे आणि समोरच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गढूळ करू शकतो. लेकीच्या जन्मानंतर आनंद व्यक्त करून झाल्यावर Dr ना मी अर्धवट शुद्धीत एकच प्रश्न विचारला, “गोरी आहे का?!” भलेभले प्रसंग विसरणारी मी, हा मात्र मनात घर करून राहिला. सावळ्या रंगामुळे कुणाचं माझ्यावरचं प्रेम आटलं, असं तर कधीच नव्हतं झालं. रंगामुळे कधी न्यूनगंड वगैरे...