हास्य फुलोरा
प्रिय, लेकीने कुठूनसा एक खेळ शोधून आणला आहे, ‘try not to laugh challenge’! कितीही हसवायचा प्रयत्न केला तरी समोरच्याने हसायचं नाही मुळीच. आणि अशाच धर्तीवर एक reality show सुद्धा नुकताच पाहिला. खेळ म्हणून ठीक आहे, मात्र खरंच हास्यास्पद विनोदावरही हसू न शकण्याची वेळ कुणावर येऊ नये. हसणं ही नैसर्गिक गरज आहे माणसाची. अनावधानाने दिलेला प्रतिसाद सुद्धा स्मितहास्यानेच पूर्ण होतो बहुतांश वेळा. आणि त्यावर रोकथाम म्हणजे गुदमरल्यासारखं होईल. हसण्याचे सारे संदर्भ एकेका अनुभवानुसार बदलत जातात. कधी मधाळ, मोहक हसण्याने कुणाच्या काळजात कट्यार घुसते आणि तीच ‘मुसकुराने की वजह’ बनून जाते. जगण्याच्या रेट्यात, सख्यांच्या गराड्यात दिलखुलास, गडगडाटी हसणं सगळी दुखणी पळवून लावतं. व्यवहाराच्या दुनियेत काही वेळा ओठांवर हसू दिसलं तरी नजरेतून कुत्सितपणा डोकावतो. हसण्यामागचा सगळ्यात अवघड undercurrent म्हणजे ‘मुसकुराऊ कभी तो लगता है... जैसे होटो पे कर्ज रखा है.’ कारण डोळ्यात पाणी काढणं जितकं तुलनेने सोपं; तेवढंच चेहऱ्यावर हसू पसरवणं कठीण... दुसऱ्याच्या आणि कधी स्वतःच्या देखील. फक्त एकदा यावर मात क...