इस पल में जीना यार
प्रिय, Unlock मुळे सगळं परत नियमितपणे सुरू होण्याच्या दिशेला निघालो आपण. सुट्टीचा कितीही कंटाळा आला असला तरी ती ‘संपतेय’ म्हंटल्यावर ‘कसे पटकन गेले नाही का एवढे महीने’ असंही होत असणार. काय काय करायचं ठरवलं होतं, त्यातलं खरंच किती काय केलं, याचा हिशोब होणार आणि कदाचित उरलेले मोजके ‘घरातले’ दिवस पुरणार नाहीत इतकी मोठी लिस्ट तयार होईल. ‘अरेच्या! अमुक पुस्तक तर राहिलंच वाचायचं.’ किंवा ‘करू करू म्हणता योगाभ्यास सुरू करण्याचा योग काही जुळलाच नाही आपला’ असंही झालं असेल. एवढंच कशाला, 24 तास सोबत राहून सुद्धा ‘आता परत काही असा chance नाही’ याचं वाईट ही वाटत असणार. गंमतच आहे नाही आपली! जेव्हा जे मिळतं तेव्हा ते पूर्ण मनाने enjoy करत नाही, हातातून सुटायला लागल्यावर मात्र आठवत बसतो. मग वेळ असो वा माणसं! नारदाची गोष्ट माहीत असेल न, काठोकाठ भरलेल्या घड्यातून ‘थेंबभरही पाणी न सांडता’ प्रदक्षिणा घालण्याच्या नादात, विष्णुदेवाचं विस्मरण झालेले नारदमुनी? ‘अखंड नामस्मरणात ही विस्मरण’! तसंच काहीसं होतं आपलंही. ‘जगण्याच्या नादात जगण्याचंच विस्मरण!’ बरं वाचतो हं आपण खू...