and credit goes to
प्रिय,
तर झालं असं, B.A. Final year ची परीक्षा! अभ्यास एकदम तय्यार. सरसर उतरवून काढायचं एवढंच बाकी होतं. खरंच. प्रश्नपत्रिका पाहिली आणि सगळं अवसान गेलं गळून. एकही प्रश्न ओळखीचा नाही? अनोळखी प्रश्नपत्रिका! शोक काही आवरेना. काहीही रखडणे मनाला पटेना. सगळे प्रश्न परत वाचले. Relate करत पुढच्या दीड तासात अख्खा पेपर लिहून काढला. मात्र, घरी येऊन हंबरडाच फोडला. कधी नव्हे ते अपयश दिसत होतं. आईच्या समजुती नंतर पुढच्या अभ्यासाला लागले. मात्र पुढच्या कोणत्याच पेपर च्या वेळी ‘त्या दिवशी’ वापरलेलं काहीही वापरणं कटाक्षाने टाळलं. न जाणो history repeat झाली असती तर?
पुन्हा असंच काही झालं, journalism केल्यानंतर पहिल्या attempt मध्येच एका प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनल साठी shortlist झाले. 3 वर्षांचा बॉन्ड! आभाळ ठेंगणं म्हणतात न तसं झालं! बस तर मग काय! त्या दिवशी वापरलेलं सगळं इतर सगळ्या महत्वाच्या ठिकाणी repeat!
दोन्ही प्रसंगांत कपडे, पेन, पर्स यांचा दूरान्वयानेही संबंध नसताना खापर आणि क्रेडिट त्यांच्या खात्यात! अंधश्रद्धा म्हणजे दरवेळी लिंबू मिरची वालीच असते असं नाही. क्रिकेट चे fans तर tremendous superstitious! पायाची घडी, बसण्याची जागा बदलली आणि नेमकं तेव्हाच बरं वाईट काही घडलं तर अख्या टीम पेक्षा ‘याचं’ contribution जास्त वाटतं त्यांना.
‘मांजर आडवं गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही’ असं म्हणणाऱ्यांच्या ही मनात इतर कोणत्या न कोणत्या self made superstitions मुळे शंकेची पाल चुकचुकत असणारच. यातल्या काही श्रद्धा/अंधश्रद्धा फार जिव्हाळ्याच्या असतात. कुणीतरी एकदा म्हंटलेल मला, ‘celebration चे फोटो display नाही करत आम्ही. नजर लागते नाहीतर.’ याच धर्तीवर कदाचित निराशाजनक स्टेटस जास्त display होत असावेत. कदाचित दुःखालाही नजर लागून ते disappear होण्याची शक्यता दाट वाटत असावी. What an idea!
Harmless असेपर्यंत या खेळातला सहभाग वावगा नाही. आहारी जाऊन त्याचा विस्तार वाढू न देणं गरजेचं. By the way, सुरुवातीला जे परीक्षेबद्दल सांगितलं, मी त्या विषयाच्या पेपर मध्ये कॉलेज मध्ये टॉप केलं होतं. एका अनुभवावरून बाकी विषयांत टॉप करायची संधी घालवली म्हणायची! आणि न्यूज चॅनेल साठी सिलेक्ट होऊनही इतर अनेक संधी शोधताना मी ते continue केलंच नाही... अन तेव्हा वापरलेल्या ‘पर्स’ ने ही लगेच काही जादू दाखवली नाही.
So! अशा प्रचिती नंतर, self made superstition बनत असतानाच तिला तडा देऊन पाहणं आणि सगळ्या वस्तूंचं मॅजिकल potential वापरणं शिकते आहे मी! Failure चं फीलिंग देणारा एखादा ड्रेस वापरुन नवीन काम हाती घेईन म्हणते. अर्थात, तसं करताना मनात इतपत निश्चित करत, की यश अपयश हे वस्तूच्या वापरावर नाही तर आपल्या एकूण तयारीवर अवलंबून असतं.
हो की नाही?
कळावे,
आनंदमयी
मस्तच
ReplyDeleteActually असं होतं कितीही नाही म्हंटलं तरी एखाद्या दिवशी काही वाईट घडलं तर आपण अशा प्रकारे विचार करतोच
ReplyDelete