एक सुरुवात अशीही ...
नमस्कार सख्यांनो,
सख्यांनो म्हणजे त्यात सखे-सख्या सगळेच आले हो!
माझं नाव सायली. काही जणांसाठी हर्षदा. सायली काय आणि हर्षदा काय. नावात काय
आहे? तर माझ्या दोन्ही नावांत
मी आहे. मी कोण? कोहम? तसा गहन प्रश्न! थोरामोठ्यांना सुद्धा सुटला असेलच असं
नाही. म्हणून सध्या मी...मीच आहे. म्हणजे मुलगी, बायको, बहिण, आई, मैत्रीण या
आणि अशा अनेक नात्यांमधून उरते ती मी! आपण सगळेच तर उरतो असे. आणि म्हणून अशा ‘मी’
कडून तुमच्यातल्या ‘तू’ साठी सहज मनातलं काही मांडावस वाटलं.
मूल जन्माला आल्यानंतर साधारणपणे दोनेक वर्षांत निदान बोबडे बोल बोलू लागतं.
माझ्या बाबतीत दोन वर्षांची होऊन गेल्यावरही केवळ ‘आई’ हाच शब्द काय तो तोंडी रुळला होता. डॉक्टर म्हणाले, “आई
म्हणतेय ना, मग बोलेल हळू हळू.” आणि अहो आश्चर्यम् ‘बोलते कि नाही’ असा संभ्रम
निर्माण करणारी ती मी ... एकदा बोलायला लागले आणि ‘थांबते का आता!” पर्यंतचा पल्ला
गाठला. मला आठवतं, थोडी बऱ्यापैकी बडबड करून झाली कि मी पप्पांना विचारायचे, “कंटाळा आला का पप्पा?”
सोबत डझनभर माणस असली तरी कुठल्या न कुठल्या निमित्ताने तोंडाची टकळी चालू
ठेवणे हे जणू परमकर्तव्यच वाटत आलं आहे मला. अक्षरशः performance pressure येतं अशावेळी.
मिनिटभराचा pause पण डोक्यात ‘इतना सन्नाटा
क्यू है !’ गाणं सुरु करतो माझ्या.
लहानपणी शाळेत पत्रलेखन शिकायच्या आधीपासून माझ्या पहि ल्यावहिल्या बालमैत्रिणीला....सखीला
पत्र लिहित आले आहे मी. जी बालपणीच दूर गावी ‘पुण्याला’ राहायला गेली. तो प्रवास पोस्टकार्ड पासून सुरु झाला आणि
इयत्तेसोबत गप्पा वाढत जाऊन दोनदोन फुलस्केप पण पुरेना झाले आम्हाला. थोडक्यात काय
दूरस्थ गप्पांमध्येही आपला हातखंडा आहे.
तर अशा साधारणतः गप्पिष्ट मला lock down मध्ये (नवऱ्याचे कान किटवल्या नंतर) उर्वरित जगाशी बोलायची
नवी पद्धत गवसली आहे आणि मला ती अजिबात गमवायची नाही.
आता हि काय आणि किती ऐकवणार असा साहजिक प्रश्न पडला असेलच. तर तंत्र आहे जुने
मात्र मी त्याच्यासाठी नवीच! त्यामुळे चुकत माकत आणि शिकत धडाधड पोस्ट्स नक्कीच
नाही करणार! So no worries! सध्याच्या
कोविड वातावरणात तुमच्या सहनशक्तीची अजिबात परीक्षा घ्यायची नाही मला. सहज सुचलेलं,
भावलेलं ...पाल्हाळ न लावता पोहोचवायचा प्रयत्न करेन. तर भेटूयात मग. आलेच.
कळावे.
@आनंदमयी
छान , खूपच मस्त
ReplyDelete