फिर जीत जाएगा इंडिया
प्रिय सख्यांनो,
पत्रास कारण ....I mean,
गप्पांना कारण की सध्या आपण lock down मध्ये आहोत!
कोरोना च्या दहशतीमुळे आपण गेले दोन महिने स्वतःच्या घरांमध्ये अक्षरशः कोंडले गेलो आहोत.
कसल्या कमालीच्या गोंधळात होतो नाही का सगळेच आपण! सुरळीत सगळं सुरु ठेवायचं
म्हंटल तरी प्रश्न! भीती होती. अज्ञान होतं. आणि अफवा तर होत्याच होत्या! बघता
बघता एखादा झोंबी पट सुरु असल्यासारखं वातावरण वाटायला लागलं सगळीकडे. बरं हे काही
एका शहरापुरतं किंवा राज्यापुरतं किंवा
त्याही पुढे जाऊन एखाद्या देशापुरतं पण नव्हतं. अख्खं जग कोरोना ने झपाटून जाताना
दिसत होतं. विदेशातले अनेक देश बांधव काळजीपोटी व्हिडीओ बनवून पाठवत होते. आणि
सगळं समजून घेत आपणही हळूहळू रुळायचा प्रयत्न करत होतो.
किती काही बदललं नाही या काळात! Lock down सुरु झालं आणि ते सुरु झाल्याझाल्या ‘माझा lock down चा अनुभव’ यावर
आधारित निबंधांची स्पर्धा सुरु झाली. मागे वळून पाहताना वाटतं ‘१५/२० दिवसांत बरंच
काही अनुभवलं’ असं वाटून आपण त्यात सहभागी झालो. तसं पाहिलं तर आता खऱ्या
अर्थाने सगळ्यांच्या च lock down अनुभवात भर पडलेली आहे.
किती ते मनसुबे आखले! पहिल्यांदाच तर अशी सक्तीची सुटी मिळाली. तीही सलग काही
दिवसांची. मस्त झोप काढायची आता. काही
धावपळ नाही. No dead lines. निवांत
आवरायचं आणि मनसोक्त आराम करायचा. Movies पहायच्या.
वेळेअभावी न जमू शकलेल्या इच्छा पूर्ण करायच्या. फिटनेस सुधारायचा. मज्जा. सुट्टीच
जणू. नाही म्हणायला work from home सुरु झालं. पण
तरी प्रवास नाही. लोकलची गर्दी नाही. वेळ आणि एनर्जी केवढी save झाली.
आणि मग नेमकं केलं काय आपण त्या वेळ आणि एनर्जीचं? न संपणारा वेळ आणि खर्च न झाल्याने अतिरिक्त एनर्जी चं
घबाड हाती लागलं. सुरुवातीला गांगरूनच गेलो कि सगळे. आरामाचा कंटाळा यायला लागला. Movies पाहून पाहून किती पाहणार असं झालं. Dead line नाही तर timetable नाही. मुलांना अभ्यास नाही. बाहेर खेळायला जाता
येत नाही, म्हणजे घरातच धुडगूस! नेमकी मस्ती शिगेला पोहोचायला आणि ऑफिस ची online मीटिंग सुरु व्हायला गाठ पडायला लागली.
Working women आणि home makers सगळ्या पदर खोचून.... sorry अंबाडे बांधून (गरम पहा न किती होतं आहे!) सगळ्यांच्या दिमतीला उभ्या ठाकल्या आणि मग त्या हि थकल्या. थोडक्यात बरेचसे मनसुबे मनसुबेच राहिले! सुरुवात अशी....मग उरलेले दिवस ढकलायचे कसे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात फेर धरायला लागला. पण म्हणतात ना ... देवाक काळजी!
बातम्यांमधून परिस्थितीचा अंदाज घेत, नव्या युगाच्या नव्या संधी शोधत,
त्यासाठी स्वतःला तयार करत आहोत. वेगवेगळे online courses आपल्याला खुणावत आहेत.
स्वतःला upgrade करण्याची हीच योग्य वेळ
असल्याने नवीन टेक्निक शिकत आहोत. आळस झटकून उरी मधल्या विकी कौशल सारखं एकमेकांना
inspire करत विचारत आहोत, “ How is the जोश?” हेच तर स्पिरीट आहे आपलं. हो ना?
या positive note वर थांबताना सध्याचं trending song ओठी येतंय ....फिर
मुस्कुरायेगा इंडिया....फिर जीत जायेगा इंडिया.
तो ....फिलहाल इतनाही.
कळावे.
@आनंदमयी
खूप छान
ReplyDelete