सुट्टी संपताना......

प्रिय,

सुट्टी संपताना......

सुट्टी सुरु झाल्याचा आनंद पुरेसा  घेत  नाही  तर ती संपायच्या मार्गावर आलीय ह्याचं  काउन्ट  डाउन सुरु होतं .

शाळा सकाळची असली तर  पिल्लांना सक्काळी सक्काळी उठवायचं आणि दुपारची  असली तर वामकुक्षीची  सवय मोडायचं पाहिलं टेन्शन येतं  आयांना. टिफिन , अभ्यास  (दरवर्षी वाढलेला ), वेण्याफन्या  या सगळ्यातून एक ब्रेक असते सुट्टी .

पण  खरं  दुःख  रोजची धावपळ पुन्हा सुरु  होणार याचं  नसतं . या काही दिवसांच्या ब्रेक मध्ये आईच्या कुशीतल्या पिल्लाची यत्ता वाढणार असते , आणि ते मोठं होणार असतं .  एकेक वर्ग पुढे जाण्याच्या जोडीला एकेक वर्ष हातातून निसटत असतं . बोबड्या बोलातली  बडबडगीते  कधी स्पष्ट शब्दातल्या  पोएम्स नी  आणि  मग  कधीतरी अचानक शाब्दिक स्पष्टोक्तीने  रिप्लेस होतात ...लक्षातही येत नाही.

सुट्टी  लहानपण  अन  मोठेपणातला दुआ होऊन जाते  आणि  "सुट्टीत रिकामा वेळ मिळतो थोडा "  असं  म्हणणाऱ्या  आईमध्ये  एक  रितेपण  सोडून जाते.


 आनंदमयी 


Comments

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट