फादर'स् डे स्पेशल

प्रिय,

Happy Father’s Day to all. आपापल्या परीने सगळ्यांचं व्यक्त करून झालं असेल नाही का? मीही केलं. आई च्या मानाने कित्येक वर्ष बाबा जरा दुर्लक्षिले गेले प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत. सगळ्यांकडूनच. एकीकडे बाबाही बदलले म्हणा काळासोबत!

आपल्या आजोबांच्या काळात म्हणे वडिलांना ‘मुलं कोणत्या इयत्तेत आहेत’ हेही माहीत नसायचं आणि कुणाला त्यात काही वावगं पण नाही वाटायचं. प्रपंच म्हणजे जबाबदारी असं काहीसं गणित असावं.  वडिलांचा दरारा आणि धाक, शिस्त यासोबत आपले पालक मोठे झाले असावेत असं एकंदर चित्र येतं नजरेसमोर. मनात प्रेम असणारच, मात्र एका हाताच्या अंतरावरून जेवढं आणि जसं पोहोचेल तसं झिरपलं असेल. म्हणून ते कमी ठरत नसलं तरी अव्यक्त मात्र राहिलं काही अंशी.

आपले पालक त्या भूमिकेत आले तोपर्यंत ‘पालकत्व’ हा शब्द रूढ झाला नसला तरी सजग वडील नक्कीच वाट्याला आले असावेत सगळ्यांच्या. मुलांची पण तर संख्या कमी झाली ना तोपर्यंत! लाड करण्यामध्ये आणि त्याच बरोबर संस्कार, मूल्य रुजवण्यामध्ये आई च्या बरोबरीने बाबासुद्धा सहभागी होते. लेकासोबत लेकीच्याही करियर मध्ये interest घेणारे, मुलांना प्रोत्साहन देणारे, अडचणीच्या वेळी support system म्हणून उभे राहणारे बाबा काळाबरोबर develop होत गेले जणू. आता नातवंडांना खेळवताना त्यांचं upgraded version दिसत रहातं. धाक, दरारा, आदर, प्रेम सगळंच भरभरून वाट्याला आलं असेल या बाबा लोकांच्या!

आणि आता त्या मुशीतून बाहेर आलेला आपल्या पिढीतला बाबा! उल्लेखच बघा ना एकेरीवर आला. कारण बाबा आमूलाग्र बदलला आता. बाबा सोबतच मित्राच्या भूमिकेत शिरला आता बाबा. Cool झाला लेकासाठी. Fun partner झाला लेकीसाठी. नाचगाणं, प्रोजेक्ट बनवणं, आईसाठी surprise तयार करणं अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये रमायला लागला बाबा. एवढंच कशाला आईची मक्तेदारी असणाऱ्या शाळेतल्या पेरेंट्स मीटिंग मध्ये ही बाबा लोकांची गर्दी दिसायला लागली. उरलंसुरलं एका हाताचं अंतर सुद्धा संपत चाललं आता. वाकून नमस्कार करतानाच मिठीत सुद्धा शिरता यायला लागलं. दरम्यान आईची मध्यस्थी हळूहळू कमी होते आहे. थेट संवाद साधला जातो आहे. नात्यातली वीण घट्ट होते आहे आणि या सगळ्यात respect सुद्धा टिकून आहे हो!

अशा मागच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांमधल्या ‘बाप’ लोकांना बाबा दिवसाच्या शुभेच्छांसाठी आजचा छोटासा लेखनप्रपंच. बाकी मनभर आणि मणभर प्रेम घेऊन समस्त ‘sons & daughters’ तयारच असतील. So celebrate & enjoy!

कळावे,

आनंदमयी

Comments

  1. अहो बाबा ते अरे बाबा पर्यंत एक गोष्ट मात्र बदलली नाही He is Real Hero for Sons and Daughters....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट