जॅक ऑफ ऑल

प्रिय,
एका सखीची नेहमीची तक्रार, ‘ मला ना खूप काही करावसं वाटतं ग आयुष्यात. चित्रं काढायची आहेत, जरा गाता गळा आहे तर गाणं पण शिकायचं आहे. कधी वाटतं आवडत्या विषयात डॉक्टरेट मिळवायचं स्वप्न, स्वप्न च राहील की काय! नाही म्हणायला ऑफिस मध्ये ‘बेस्ट एम्प्लॉयी’ चं अवॉर्ड मिळालं आहे, तरी स्वतःचं काही पाहिजे ग. एखादं recipes चं यूट्यूब चॅनेल सुरू करावं, असं पण आहे मनात. ‘एक ना धड भराभर चिंध्या, असं झालं आहे माझं.’
आसपास अशी अनेक ‘उदाहरणं’ असतात ज्यांना सगळ्यातलं ‘सगळं’ नाही, पण सगळ्यातलं ‘बरंचसं’ येत असतं. कुठल्याशा एक क्षेत्रापुरतं कुंपण घालता येत नाही कुणाकुणाला. म्हणजे चांगलं जमत असतं बरंच काही. गाणं, वाजवणं, वक्तृत्व, dance, चित्रकला, पाककला, फोटोग्राफी, रिसर्च आणि अनेक गोष्टी एकाच व्यक्तीला जमू शकतात.
मला सुद्धा खूप काही करायचं होतं. ‘पत्रकारिता, अभिनय, dance, गाणं, मध्येच हुक्की यायची कॉर्पोरेट ऑफिस ची ऐष करायची, मग एखादं ‘सदर’ असायला हवं आपलं, असंही मनापासून वाटायचं, बोलायला आणि ऐकायला आवडतं म्हणून त्यातही काही करता आलं तर बहारच... अबब! लिस्ट मोठीच होत गेली नाही का माझी! माझ्या सुदैवाने घरून मला कशाचीच आडकाठी नाही झाली, उलट प्रोत्साहन मिळालं. आणि यातलं सगळं करू शकले मी. माझ्यापुरतं मिळवू शकले खूप काही! मागे राहिल्याचं feeling नाही आलं कधीच! मुळात ‘कुणाच्या मागे राहू’ हे माहीत नसल्यामुळे नसेल आलं कदाचित!
पण बघा ना, एक व्यक्ति आपल्या संपूर्ण वयोमानामध्ये (lifespan) शेकडो प्रांत फिरून येऊ शकणार असेल तर खऱ्या अर्थाने रसिक बनेल! आणखी एक म्हणजे अडणार नाही हो शक्यतो कुठेच. कुठल्याही क्षेत्रात टाका, गटांगळ्या खाण्याची शक्यता कमी. तरून जाणार. ही तर काळाचीही गरज आहे. एक्स्पर्ट नकोत असं नाही. मात्र सर्वगुणसंपन्न हवेत.
‘Jack of all trades, master of non’ ऐकलं असेलच सगळ्यांनी? ‘एक ना धड भराभर चिंध्या’ हे इंग्रजी व्हर्जन मध्ये ‘सुनावण्यासाठी’ हेच ‘जॅक ऑफ ऑल’ धावून आलेले असतात! ‘मास्टर ऑफ नन’ म्हणजे थोडक्यात नालायक (ना-लायक) असं काहीसं negative साऊंड होतं.
काय हरकत आहे ‘जॅक ऑफ ऑल’ असायला? जमू द्यावं की थोडं थोडं सगळंच. आता तर ‘अमुक विषयात माझा हातखंडा आहे’ असं म्हणून केवळ चालणार नाही. तर technical knowledge पण हवंच. हुशारी हवी तशीच एखादी कलाही हवी. म्हणजे ‘जॅक ऑफ ऑल’ हवेत! थोड्या फार फरकाने सगळ्याच क्षेत्रात survival साठी गरज आहे ‘जॅक’ ची.
मग एक ना धड... ला All rounder अशी positive झालर नाही देऊ शकत का आपण? ‘मी कशातच एक्स्पर्ट नाही’ यापेक्षा ‘मला कितीतरी गोष्टी करता येतात,’ हे नक्कीच सकारात्मक आहे. हा विश्वास पुढच्या आयुष्यातही उभारी देणारा ठरेल. निदान माझ्यासारख्यांना विश्वासाने म्हणता येईल, ‘I’m proud to be jack of all, because it allows me to become master of many.’
सांगायला हवं त्या मैत्रिणीला, 'तक्रारीचा सूर न लावता, सगळं करून पहा.' ऑल राउंडर सख्यांमध्ये भर नको का पडायला माझ्या!
काय म्हणता?
कळावे,
आनंदमयी
0
People reached
0
Engagements

Comments

  1. मी एक पुस्तक वाचले होते.आता मला त्याचे नाव आठवत नाही.पण त्याचा लेखक एक बिझनेसमन होता.पण तो स्वतः ला autrapinar म्हणजे जोखीम उचलून व्यवसाय करणारा असा शब्दकोशात त्याचा अर्थ आहे.हा जन्माला येत नाही त्याला घडवावे लागते.. त्याला महत्व वाटते ते आफ लातून आणि चमकदार कल्पना निर्माण करण्याचे.त्यासाठी तो आकाशपाताळ एक करतो.आणि जेव्हा त्याची कल्पना मनासारखी व्यवहारात उतरते त्यावेळी त्याला स्वप्नं पुर्ण झाल्याचा आनंद मिळतो.तुझ्या आजच्या लेखातून असे वाटले की खरंच आपल्याला बऱ्याच गोष्टी एका वेळी करायच्या असतात.तिथे आपण autrapinar सारखे आपल्या सगळ्या इच्छा,स्वप्नं thodi thodi Purna करूयात.मस्त लेख

    ReplyDelete
  2. Positively जॅक ऑफ ऑल...
    मी लहान असतांना पप्पा नेहमी म्हणायचे सगळ्याच गोष्टीत आपण expert असायला हवे असे नाही पण आपल्या पुरते तरी सगळे यायला हवे...यामुळेच आपण स्वावलंबी होतो ...आणि आनंदमयी च्या शब्दात All rounder

    ReplyDelete
  3. एका आयुष्यात खूप काही करता येत, आपला मेंदू फार गहन आहे, खूप काही साठवण्याची क्षमता आहे त्याची. मनाला भावेल त्या त्या क्षेत्रात कार्यरत होऊन निखळ आनंद मिळवता आला पाहिजे. मग त्यासाठी मास्टर असायलाच हवे असे नाही.
    खूप छान मांडलाय विषय.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. खूप छान लेख... तरल मांडणी..
    जे काही नवीन असेल, शिकण्यासारखे असेल आणि त्याहूनही ते इतरांनाही वाटता येण्यासारखे असेल तर आपण ते शिकावे, असंच आजपर्यंत वाटत आलं आहे. यामागची भावना सकारात्मक होती, आजही आहे. त्यामुळे कठिण परिस्थितीतही स्वत:लाही सकारात्मक ठेवता आलं मला. खूप काही शिकायला मिळालं.
    वेळ मिळेल तसं शिकत राहावं प्रत्येकाने, technically तर नक्कीच... त्या शिकण्यातला आनंद खरंच खूप वेगळा असतो. तो आनंद अगदी तणाव, दु:ख ही विसरायला लावतो. पुन्हा नव्याने स्वत:ला शोधता येतं. कधी वाटतंही हे सोप्पं नाही, पण आपल्या माणसांची सोबत असली की कठीणही वाटत नाही.
    निसर्गात तर खूप काही शिकण्यासारखे आहे की हा जन्म कमी पडेल. पण आवडीचं काही शिकता आलं, संपूर्ण आत्मसात करता आलं तर तो आनंदही वेगळाच.

    ह्या लेख वाचताना मनाचा संवाद मनाशी घडवून देतो. आणि all rounder ही उपमाही अगदी समर्पक आहे. आजच्या जगात all rounder jack बनायला खूप वाव आहे, फक्त मनाचा आवाज ओळखता आला की झालं.
    मग आत्मनिर्भर व्हायला देखील हे शिकणं खूप काही देऊन जाईल.
    Lots of Love dear 💞

    ReplyDelete
    Replies
    1. तू ही एक all rouder मैत्रीण आहेस की माझी

      Delete
  6. वा छान एकदम.. नकारात्मक विचार एकदम शुद्द करण्याचं सामर्थ्य या लेखात आहे , उत्तम स्फुरण आणि विचार अर्थात..💐😊

    ReplyDelete
  7. खुप छान लेख. अगदी खरं म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून बघताना जाणवत की अरे आपण अमुक करू शकलो असत , पण ते केलच नाही,आपल्याला यात थोडी गती होती पण दुसऱ्या काही विशेष महत्वाच्या नसलेल्ल्या ( म्हणजे आता तस वाटत) गोष्टींमध्ये आपण उगाचच अडकून बसलो आयुष्याची वर्षे वाया गेली वैगरे. पण असा पॉझिटिव्ह अँप्रोच ने बघितलं तर खंत वाटणार नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट