फुटपट्टी

प्रिय,
बारावीच्या result ची तारीख declare झाली एकदाची. परीक्षेइतकंच प्रेशर असतं बुवा या दिवसाचं. निकाल चांगला लागला तर दिवस संस्मरणीय, ‘निक्काल लागला’ तर अविस्मरणीय! 🙃
माझा बारावीचा निकाल संस्मरणीय गटात मोडतो. त्याला कारणही तसंच. मार्क संस्मरणीय च होते अर्थात. कारण मी कला शाखेची विद्यार्थिनी. कला शाखेसाठी ७४% म्हणजे पुष्कळच म्हणायचे! मस्त खुशीत पेढे वाटले आणि सगळ्यांना आनंदाने सांगत सुटले ७४ चा आकडा. एका ओळखीच्या घरी गेले तर ते मात्र आकडा ऐकून चक्क हळहळले! “अररर! ७४%? Distinction थोडक्यात हुकलं म्हणायचं.” आनंदाने तट्ट फुगलेल्या फुग्यातून हलकंसं ‘फुस्स’ झालं. ☹️ तेवढ्यापुरतंच! कारण एका टक्क्याने माझी हुशारी काही वाढली नसती. माझ्यापुरतं तेच डिस्टिंकशन होतं. 🥳
अजून ही कुणी ‘सोडलेल्या वाटा आणि त्यातलं संभाव्य यश’ आठवून हळहळ व्यक्त केली की तसंच होतं माझं. कळत नकळत स्वतःला किंवा आसपासच्या अनेकांना so cold यशाच्या तराजुमध्ये तोलून पाहतो आपण. ‘अमुक काही मिळवलं म्हणजे यश मिळालं’ असं मानणं एकांगी वाटतं मला.
असतात ना खूप सारी टॅलेंटेड माणसं, जी रूढ अर्थाने तितकीशी नावाजलेली नसली तरी successful मात्र आहेत. आयुष्यात काय मिळवलं म्हणजे आपल्याला समाधान मिळेल याची व्याख्या त्यांच्याकडे तयार असते. मग ते उत्तम वादक, गायक, चित्रकार असे कलाकार असोत वा sports person किंवा एम बी ए पासून पीएचडी पर्यन्त पदव्या घेतलेली माणसं अथवा ठरवून घरी राहून सगळ्या जबाबदाऱ्या निभावणाऱ्या गृहिणी! ही सगळी मंडळी यशाच्या अशा शिखरांवर विराजमान आहेत, जिथे केवळ त्यांचाच अधिकार आहे. कारण त्यांची यशाची व्याख्या self-made आहे.
अरेच्या! आपण सगळेच तर मोडतो यात. आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातही खूप साऱ्या अशा opportunities आलेल्या असतात, ज्या काही वेळा ‘असामान्य संयमाने’ नाकारल्या जातात, केवळ यशाचा आपला parameter किंवा व्याख्या आपण स्वतः सेट केलेली असते म्हणून! काहींना नोकरी मध्ये अमुक आकडी पगार म्हणजे success वाटत असेल, तर कुणासाठी कौटुंबिक स्थैर्य हवं म्हणून नोकरीतल्या बढती-बदलीला तिलांजलि देणं जास्त सोपं जात असेल. एखाद्या गायकाला स्वतःचा album रिलीज करण्यात यश दिसेल, तर कुणाला दुसऱ्याला गाणं शिकवण्यात. कुटुंबाला वेळ देऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माझ्या सगळ्याच मैत्रिणींची देखील यशाची संकल्पना निराळी आहे. 💁‍♀️ प्रत्येकाची आयुष्याकडून असलेली अपेक्षा निश्चितच सारखी नसते ना. आणि तिथपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न ही प्रत्येकाचे वेगळे.
कधी ही यशाची measurements कौटुंबिक किंवा व्यक्तिगत स्तरावरची असू शकतात तर कधी सामाजिक. यातूनच कुणी आमटे कुटुंबियांसारखे यशाच्या प्रचलित मोजमापा पलीकडे जातात.
अर्थात कुणाला काय पाहिजे हे ज्याचं त्याने ठरवावं. नाहीतर, संत्री किंवा द्राक्ष खाऊन super happy होणाऱ्या माणसाला, ‘जगाने आंब्याला राज्य दिलं’, म्हणून मारूनमुटकून का होईना, आंब्यातच आवड शोधावी लागेल. आणि असा तर ‘माझा आनंद’ मला सापडणारच नाही. तेच काहीसं success चं. दुसऱ्या कुणाच्या फुटपट्टीने ते मोजण्यापेक्षा आपणच आपली मोजमापं तयार ठेवावी. नाही का?
कळावे,
आनंदमयी

Comments

  1. बरोबर आहे

    ReplyDelete
  2. दूस-याच्या फुटपट्टीने स्वत:ला मोजायला जाल तर कायम अपुरेच रहाल
    State your own standard ...

    ReplyDelete
  3. Don't compare any body with us मी मी आहे आणि माझ्याकडे जे आहे ते ईतरा कडे नाहि हि भावना महत्वाची बाकि मस्त

    ReplyDelete
  4. True....Always remember मैं मेरी favourite हूँ

    ReplyDelete
  5. काही भाग वाचले . सुंदर लिहिते आहेस तू . पु.शि. रेगेंची सावित्री स्वतःला आनंदभाविनी म्हणते - समजते. तू स्वतःला आनंदमयी म्हणतेस . किती जवळिक आहे तुमच्यात. तुला घेऊन सावित्री करायचं होतं. राहिलं. मी सावित्री अखेर केलं पण तालमींच्या वेळी खुपदा तू आठवायचीस. हे तुझं लेखन वाचायला आवडतंय. सगळं वाचेन उद्या. अशीच आनंदमयी रहा - आनंदमयी रहा .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट