कठीण समय येता...
प्रिय,
नुकताच एक forwarded मेसेज वाचण्यात आला. शब्दशः सांगत नाही बसत, 2020 हे वर्ष आयुष्यातून डिलीट करण्याबद्दल होता. वाईट आहेच परिस्थिती अर्थात. 100 वर्षात एकदा येणारी situation! खूप काही सोसावं लागत आहे आपल्याला. नको नको झालं आहे आता इतिहासाचे साक्षीदार आणि भागीदार बनणं. पण म्हणून सरळ अख्ख वर्ष वजा करायचं?
सततच्या गोड जेवणाने ही कधी मळमळ होते. तिखट, आंबट, तुरट अगदी कडू सुद्धा हवंच असतं की आहार संपूर्ण व्हायला. नुसत्या जेवणातच नाही, आपलं प्रचंड प्रेम असतं अशा आई वडिलांपासून ते नवरा बायको वा भावंडं किंवा प्रियकर प्रेयसी अशा सगळ्या नात्यांमध्ये तरी कुठे सगळं फक्त गोग्गोड असतं? म्हणून माणसं तोडून नाही टाकत आपण. सगळ्यांच्या सोबतीने जगतो आणि त्यामुळेच आठवणी तयार होतात.
आयुष्याचंही तेच आहे. ‘कोलाज’च तर असतं ते एक. वेगवेगळ्या भावनांचं, प्रसंगांचं. ‘जगायचं’ असं एकदा ठरलं ना, मग एकसूरी कशाला मागायचं? ‘Colourful life’ हवं म्हणताना एकाच रंगाची अपेक्षा तर नाही करत आपण. धमाल, excitement, आनंद, समाधान, निराशा, हतबलता, असूया सगळं हवं... प्रसंग चांगला असला तर तो enjoy करायचा, बिकट असेल तर नाकारायचा? असं करता त्याला accept करेपर्यंत वेगवेगळ्या रूपात येईलच ना मिठी मारायला! मग जेव्हा येतो तेव्हाच घ्यायचा कवटाळून! कोण जाणे पुढे जाऊन त्याच प्रसंगाच्या बळावर ‘संकटावर मात करणे’ या विषयात मातब्बर होऊ आपण! ‘जिंदगी को गले लगाना’ म्हणजे तरी काय असणार वेगळं.
शिवाय नकोच असेल मनाविरुद्ध काही, तर दुसऱ्या कुणाच्या अनुभव कथनावरून सगळं अनुभवता येतं का ते पाहावं लागेल. मग त्यात negative सोबत सगळ्या मौल्यवान क्षणांना देखील मुकावं लागेल. मळभ दाटून आल्यावर येणारी उदासी आणि ते दूर सरल्यावर वाटणारा fresh feel असं सगळंच आलं त्यात.
एव्हाना गणपती विराजमान झाले असतील सगळीकडे. विसर्जनाच्या वेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं दाटल्या कंठाने बाप्पाला म्हणताना, सध्याच्या situation मधून लवकर बाहेर पडण्याची अधीरता नक्कीच असणार आहे. या बाबतीत आपण सगळेच थोड्या फार फरकाने एकाच नावेत सवार आहोत. त्यामुळे या कठीण समयी, त्या विघ्नहर्त्याकडे ‘संकटी पावावे’ सोबत संकटाला तोंड देण्यासाठी धीर ही मिळावा अशी प्रार्थना.
तोवर 2020 च्या ‘देणग्यांची’ एखादी लिस्ट करावी असा विचार आहे. काहीतरी तर बरं सापडेलच उभारी देण्यापुरतं, अशी आशा.
तोपर्यंत,
कळावे,
आनंदमयी
Very nicely written 👌 👏
ReplyDeleteवर्ष delete करण्याच्या खूप post वाचल्या पण ह्याच 2020 मध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायला सांगणारी ही पहिलीच post ह्या positive attitude साठी सलाम आनंदमयी keep it up
ReplyDeleteथॅंक यू वहिनी
Deletethank you so much
ReplyDeleteVery nicely written.. Simply a required perception.. nice Sayli 😊👍💐
ReplyDeletethank you Tushar
DeleteYes true..
ReplyDeleteस्वीकाराची जादू! 😇