लंच ब्रेक
प्रिय,
‘में ऑनलाइन हू, तू भी ऑनलाइन है।’ असं म्हणत सुरू झालेली शाळा आता सगळ्यांच्या अंगवळणी पडली. टीचर्स मुलांच्या किलबिलाटाला, मस्तीला आणि overall शाळेला किती miss करतात अशा आशयाचा, विनोदी ढंगाने सादर होणारा एक video पाहिला नुकताच. हसू निश्चितच आलं ओठांवर, मात्र स्टाफ रूम मधल्या टिफिन शेअरिंग बद्दलचा संदर्भ येताच डोळ्यात पाणीही दाटून आलं. गेल्या कित्येक महिन्यात work from home मुळे हा एक ‘सोहळा’ प्रचंड miss केला सगळ्यांनी.
केवळ मुलं किंवा टीचर्सच नाही तर समस्त working men – women ची (क्षेत्र कोणतंही असो) हीच कथा असणार. काय नसतं त्या टिफिन शेअरिंग मध्ये! डबा आणि त्यातले पदार्थ तर असतातच. त्या निमित्ताने एकमेकांच्या
आवडीनिवडी जपल्या जातात. अमुक पदार्थ एखाद्याच्या खास आवडीचा असला, की आठवणीने शेअर केला जातो. कधी तर मुद्दाम ठरवून आणला जातो. आणि चुकून नेमकी त्याच दिवशी ती व्यक्ति न कळवता absent असली की दुसऱ्या दिवशी दिला जातो खाण्यासाठी हमखास ‘ओरडा!’
recipes कितीही शेअर केल्या तरी एखादीच्या ‘हातच्या चवीसाठी’ विशिष्ठ पदार्थ त्याच व्यक्तीकडून मागून खायची प्रथा असते. आत्ता लिहिताना सुद्धा वेगवेगळ्या डब्यांमधले पदार्थ दिसत आहेत नजरेसमोर.
बरं तुम्ही म्हणाल बायकांचं प्रस्थ हो हे सगळं! तर पुरुषही मागे नाहीत या बाबतीत! स्वतः भले करता येत नसेल स्वयंपाक, मात्र बायकोला सांगून मित्राच्या आवडीचा पदार्थ टिफिनमध्ये न्यायला विसरणार नाहीत. बच्चे कंपनीचं ही तेच. आपण नाही का शाळेच्या ग्रुप वर आठवणीनं अजूनही एखाद्याला सांगतो की 'तुझ्या आईच्या हातचे पोहे मला फार आवडायचे म्हणून?'
मात्र लंच ब्रेक काही केवळ खाण्यासाठी नसतो. त्यातूनच जुळत जातात ऋणानुबंध. वैयक्तिक आयुष्यात काहीही उलथपालथ होत असली, तरी ‘इथे’ बोलून मोकळं झालं की मिळणारा दिलासा उभारी देऊन जातो. कळतं, ‘अरेच्या! आपल्यासारखे खूप आहेत जगात.’ आणि नकळत भार हलका होतो. सांगून ‘मोकळं होणं’ अक्षरशः अनुभवता येतं. रहाटगाड्याचा विसर पडतो काही वेळासाठी आणि mind divert होतं नकोशा heavy feelings पासून. आपल्याही नकळत वेळप्रसंगी सहानुभूती, सोबत, पाठिंबा, प्रोत्साहन तर कधी सूचना, टीका सुद्धा याच वेळेत पदरी पडतात.
आनंद जाहीर करतानाही celebration साठी लंच ब्रेकच हवा. कधी ‘गुड न्यूज’ तर कधी मुलांचे बक्कळ मार्क! अहो, नवा मोबाइल घेतला हे ही निमित्त पुरतं पार्टी साठी. भले ती पार्टी नुसत्या वडापाव ची असो!
तर असा हा लंच ब्रेक. घासभर का होईना समोरच्याची आवड जपणारा, भुकेसोबतच गप्पांच्या ओढीने हवाहवासा वाटणारा, पुन्हा ‘जसाच्या तसा’ लवकर सगळ्यांच्या वाट्याला येवो. गप्पांना उधाण तर येईलच, सोबत पदार्थही शेअर करता यावेत आणि हो, लॉक डाऊन मुळे सुस्तावलेल्या मनाला नवं चैतन्य मिळावं, ही सदिच्छा.
तोपर्यंत,
कळावे,
आनंदमयी
खरं आहे,गणपतीचे मोदक करताना आणि भरली वांगी करताना तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते.missing those days..
ReplyDeleteMissed it so much
Deleteखूप चांगल्या आठवणी ताज्या झाल्या तुझ्या लेखा मुळे....
ReplyDeleteखुप छान 👌
ReplyDeleteMastch
ReplyDeleteMastttt
ReplyDeleteThank you everyone
ReplyDeleteछान लिहितेस यार तू, खूप सुंदर. लिहीत रहा आणि या सर्व लिखाणाचं पुस्तक काढ , खूप शुभेच्छा💐
ReplyDeleteमोठीच पावती दिलीस तुषार. Thank you so much
Delete