स्वीकार
प्रिय,
नुकत्याच ऐकलेल्या एका ऑडिओ मध्ये अगदी एकाच वाक्यात आलेला, पण मनात जागा करून ठाण मांडून बसलेला शब्द म्हणजे Acceptance - स्वीकृती.
आहे ते स्वीकारणं. जसं आहे तसं स्वीकारणं. वय, यश-अपयश, दिसणं, परिस्थिती, प्रसंग, वेळप्रसंगी मनात उमटणाऱ्या नकारात्मक भावना, माणसं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःला! सोपं नाही हो!
कमाल असते नाही आपलीपण! आपण स्वतःला नेहमी आहोत त्यापेक्षा कुठेतरी वरचढ प्रतिमेत शोधत असतो. जसं, सौष्ठावाच्या बाबतीत (figure हो) सगळ्यांनाच ‘रती मदनाचे पुतळे’ व्हायला आवडतं. मात्र वजनाचा आकडा वाढत आहे हे पाहूनही, आपण व्यायामाला लागत नाही आणि तेवढेच ‘रती’ आणि ‘मदन’ दूर पळू लागतात.
असते की मनात ‘आदर्श प्रतिमा’ स्वतःची! फक्त बरेचदा ती दुसऱ्या कुणीतरी आखून दिलेल्या टर्म्स वर आधारित असते. घुसू पाहतो आपण त्या भूमिकेत ‘perfection’ सकट. त्यातल्या काही अटींवर खरे उतरत नसलो तर ... ओढाताण करून का होईना तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत बसतो. जसं लग्नानंतर नव्या नवरीचं होतं! अल्लड, अवखळ राजकुमारी ते गृह्कृत्यदक्ष, सुगरण, आदर्श सुनेच्या भूमिकेमध्ये चपखल बसण्याचं pressure झेलत राहते. ती ‘ती’ उरत नाही कितीतरी काळ. काही वर्षांनी तीच ‘नवरी’ तिच्या plus points च्या जोरावर सगळ्यांना आपलं करते. कारण ती एवढ्या वर्षात स्वतःला ओळखून accept करायला शिकलेली असते. आपोआपच इतर सगळे स्वीकारतात तिला. जशी आहे तशी!
आदर्शाच्या तराजूमध्ये बसवून, जर सर्व काही तोलून पाहायला लागलो तर वास्तव काही भलतंच दिसेल. मग ना आदर्श स्वीकारता येईल ना वास्तव! आहोत तसे स्वतःला स्वीकारू शकत नसू तर इतरांकडूनही तशी अपेक्षा करू शकणार नाही.
अर्थात ‘आहे तसं स्वीकारा’ म्हणून पळवाट काढणे, असा अर्थ नाही होत याचा. अन्यथा कामाच्या ठिकाणी ‘माझा कामचुकारपणा मी accept केला आहे… तुम्हीपण accept करा’...अशी उत्तरं मिळायला लागतील. त्यामुळे आहे ते ‘आहे तसं’ स्वीकारल्यावर त्यात गरज भासल्यास बदल करण्यासाठीची पहिली पायरी म्हणून याकडे पाहायला हवं.
काही गोष्टी accept न केल्याने 'फुकाचे गैरसमज' पिढ्यानपिढ्या पोसले जातात.... पुरुषी अहंकार त्यातलाच (‘मर्द को दर्द नही होता, रुक्ष, असंवेदनशील किंवा calculated ’) आणि बायकांविषयी कल्पनाही तशाच (हळव्या, सोशीक, त्यागमूर्ती) दोन्ही टोकं! दरम्यान व्यक्तिपरत्वे काही नियम बदलत असतील हे पटकन accept च नाही करत आपण. सुवर्णमध्य साधणे जमायला पाहिजे.
लावलेल्या लेबल पलीकडे accept करायला धाडस लागतं. असंख्य लेबल्स acceptance अभावी अस्तित्वासाठी झगडा करताना दिसतात समाजात. Transgender community असो वा शोषणाचे बळी हे त्याचं सर्वपरिचित उदाहरण.
तसं पाहायला गेलं तर एका शब्दाला अनेक कंगोरे असतात. त्याचे अन्वयार्थ एका बैठकीत उलगडण्याच्या पलीकडचे. त्याचं ‘डेली रीच्युएल’ मध्ये रुपांतर व्हायला थोडा वेळ तर द्यावाच लागेल!
So till then, Accept the Beautiful Mess that you are and see the life changing magic!
कळावे.
@आनंदमयी
एकदम संतुलित लेख, छान
ReplyDeleteवास्तव सत्य
ReplyDeleteVery good that's true
ReplyDeleteKalabarobar change honyacha Sandesh..
ReplyDeleteAani tya change la accept kelyashivaay pragati hot naahi!!
Masttach 😄😄
Khup aawadleli vakye👇
लावलेल्या लेबल पलीकडे accept करायला धाडस लागतं.
Accept the Beautiful Mess that you are
खरंच आनंदमयी आहे त्या परिस्थितीचा, रुप-रंगाचा, इतर गोष्टींचा स्वीकार केला की आयुष्य खूप सुंदर आणि सोपं होतं
ReplyDelete