संकल्प
प्रिय,
तर...finally, आपण सगळेच पोहोचत आहोत 2020 च्या official शेवटाकडे! अंधाराकडून प्रकाशाकडे चं feeling आणि hopes उराशी बाळगत. संकल्प करायचे दिवस पण हेच की! स्वतःला संधी देऊन पहायचे दिवस. व्यायाम, डाएट, एखादा छंद जोपासणे... अगणित शक्यता!
संकल्पांच्या यादीत थोडी addition टाकावी म्हणते. शिक्कामोर्तब न करण्याचं आणि न करू देण्याचा संकल्प! स्वतःला आणि इतरांना स्वातंत्र्य देण्याचा संकल्प!
अगदी एखाद्या वाक्यावरून, ऐकीव माहिती किंवा चक्क केवळ पेहराव पाहून माणसांना आपण सहज divide करतो दोन रंगांत. दोन parameters मध्ये. चांगलं आणि वाईट! ‘Grey’ ही नितांत सुंदर शेड विसरूनच जातो. जाणून लक्षात ठेवावं लागतं, ‘परफेक्ट असं कुणीच नसतं. कुणीच संत नाही आणि कुणीच खलनायक ही नाही. सगळी फक्त माणसं!’ प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला shades असतातच. म्हणून शिक्का नको वाटतो.
मिळायला हवं प्रचंड positive विचारांच्या व्यक्तीला क्वचित negative असण्याचं, सदैव शहण्यासारखं वागणाऱ्या माणसाला वेड्यासारखं वागण्याचं स्वातंत्र्य. तसंच जबाबदारीच्या जोखडाखाली दबून गेलेल्याला, कधीतरी बेजबाबदारपणाची मोकळीक तर आज्ञाधारकाला एखाद्या वेळी आज्ञा मोडण्याची मुभा मिळायला हवी. सततच्या होकाराला नकाराचं स्वातंत्र्य मिळायला हवं. Without judgement!
आपणच लावतो बरं हे रंग. करून टाकतो एखाद्याला ‘हुशार’ आणि हिरावून घेतो त्याच्याकडून एकही silly mistake करायचे हक्क. असंच कुणी त्यागमूर्ती बनून, न्याय्य गोष्टीसाठीही चकार शब्द काढायचा हक्क गमावून बसतं. कधी तर या ‘frame work’ चा त्रास होतो आपल्यालाच. कारण समोरच्याची image आपणच तयार केलेली असते. जी खरं तर originally असते सगळ्या रंगांची रसमिसळ. फक्त आपण आपल्याला हवा तोच रंग highlight करतो सोयीनुसार, कधी आवडता गडद तर कधी नावडता. एकतर व्यक्ति चांगली किंवा वाईट असं सरसकट ठरवून टाकतो. आणि तिला तडा गेला तर सहन होत नाही आपल्यालाच.
सामन्यांच्या बाबतीत असं तर असमान्यांची काय तऱ्हा! त्यात एखाद्या व्यक्तीला ‘देवत्व’ बहाल केलं की प्रश्नच मिटतो. चुकून फ्रेम मध्ये अडकलेल्या देवाकडून चौकट मोडून, त्याचं ‘माणुसपण’ बाहेर आलं की जो काही हंगामा होतो! ‘चौकट मोडलीच कशी’ ते ‘मोडणं शक्यच नाही’ इथपर्यंत सगळीच टोकं गाठली जातात.
आदर्श म्हणून ओढूनताणून खिताब टिकवण्याच्या नादात स्वतःची घुसमट करून घेण्यात काय हशील! म्हणून थोडं स्वातंत्र्य हवं. आपणच देऊ शकतोय ते एकमेकांना. माझ्या सगळ्या चौकटींना फटी करायला घेतल्या आहेत मी. चिडक्या फ्रेम मध्ये हसू स्वीकारण्याइतपत, सदैव हसतमुख असणाऱ्याच्या अश्रूना वाट देण्याइतकी. परफेक्ट नायकाला वेळप्रसंगी खलनायक वठवण्याइटकी. आणि खलनायकालाही anti-hero चा रोल देईन म्हणते.
गोतावळा मोठा, त्यामुळे Daily practice खूप गरजेची आहे. मात्र कधी न कधी मोकळं करीनच एकेकाला. मोकळी होईन मी ही कधी न कधी!
तोपर्यंत, कळावे.
आनंदमयी
Very much matured and phylosophical. I am happy to see your inner growth...may be this is your origin. Thanks and proud of you Syli.
ReplyDeleteit means a lot to me sir.
ReplyDeleteचांगला संकल्प....आपल्या चौकटीत बसणार ते चांगलं आणि जे बसत नाही ते वाईट असं
ReplyDeleteब-याचदा होतं त्यापेक्षा हे चांगलं की ठराविक चौकटीत कोणाला न बसवता प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळेपण स्वीकारावं