मेरे मन को भाया ...

 प्रिय,

'न्यू नॉर्मल' सोबत सुरुवात करताना, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने, वर्षभर भेटीगाठी न झालेल्या अनेक मैत्रिणींना भेटणं झालं आणि सगळ्यांच्या तोंडून एक प्रश्न/ उद्गार/ आश्चर्य व्यक्त करणारं वाक्य ऐकायला मिळालं.... “अय्या, परत कुरळे झाले तुझे केस?!” आणि त्या पाठोपाठ; ‘किती छान दिसत होते smoothening असतानाचे केस’ पासून ‘कुरळेच बरे शोभतात तुझ्या चेहऱ्याला’ पर्यंत अनेक compliments आणि comments! केस म्हणजे बायकांचा weak point नाही का! तर या दोन वर्षात मी माझ्याच केसांवर केलेल्या प्रयोगात; अनेकांची मिश्र मतं जोडल्या गेली.
आणि त्यावर उत्तरताना, चायना गेट मधला व्हिलन आणि त्याचा quote करण्याइतका भारी डायलॉग दरवेळी मनात (काही वेळा ओठांवर) यायचा, “मेरे मन को भाया, मैने ... काट के खाया!” यातला टोकाचा भाग सोडला तर आनंदी राहण्याचा मंत्रच जणू!
‘मनाला हवं तसं वागणं’ एकाच वेळी किती सोपं आणि कठीण असू शकतं! बरं हे फक्त बायकांपुरतं नाही हं मर्यादीत. मन मारत जगण्यावर कुणा एका gender ची मक्तेदारी नाही, तशी ती मनासारखं जगण्यावरही नसायला हवी. त्यामुळे हे सगळ्यांना लागू.
क्षुल्लक वाटणाऱ्या कितीतरी इच्छा दबून जातात ‘कोण काय म्हणेल’ च्या नादात! पाहायला गेलं तर, ‘लोगों का काम है कहना!’ आपणही करतोच की नकळत हे काम. अनाहूत मत प्रदर्शनाचं! फक्त आपल्या मताबद्दल समोरच्याला काही घेणं देणं नसतं. आणि नेमका हा तर्क स्वतःला लागू करायला आपण कचरतो. त्यावर मात करून एकदा 'मनापासून मनासारखं' वागून पाहिलं की आपल्यातला मोगॅम्बो ‘खुश’ होतो. (हिन्दी चित्रपटातले व्हिलन्स फारच बाई तत्वज्ञानी!)😉
नुकतंच valentine’s day च्या निमित्ताने प्रेमाचं celebration झालं. मुळात स्वतःवर प्रेम असेल तर ते भरभरून देता येऊ शकेल. कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? आणि प्रेमात पडायचं म्हणजे इतरांचा विचार करून कसं चालेल, नाही का? एकमेकांचं मन राखलं जातं, तशी स्वतःची मर्जी राखून पहावी. जगाची पर्वा न करता, काही गोष्टी केल्या जातात, तसे स्व आनंदा करता घेतले काही वेड्यात काढणारे निर्णय तर?
To be very honest, हे सगळं काही ‘वडिलो’पार्जित आलं हो माझ्याकडे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मीही घेते आहे मजा; आयुष्याच्या प्रेमात असण्याची. त्यामुळे माझ्यापुरतं मी ठरवलं आहे, ‘छोडो बेकार की बातों में... कही बीत ना जाये ...’

तुम्ही काय म्हणता?

कळावे,
आनंदमयी

Comments

  1. मस्त लेख 👍
    Jab we met च्या गीत (करीना) प्रमाणे "मैं अपनी favourite हूँ"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट