ओह वुमनिया!
प्रिय,
नववी दहावीला असताना शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने घडलेल्या एका प्रवासात, नुकत्याच सुरू झालेल्या ‘आभाळमाया’ मालिकेतल्या नायिकेवर ‘नवऱ्याने केलेली प्रतारणा निमूट सहन करते’ म्हणून चिडलेल्या रिसबुड मॅडम म्हणाल्या होत्या, ‘मी तर अजिबात सहन केलं नसतं.” मनात कुठेतरी येऊन गेलं, ‘अरे बाप रे! बाईने सहन न केलेलं चालतं?!’
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडलेली असताना खूप जणांनी मला प्रभावित केलं; त्यातली एक शुभांगी ताई. इचलकरंजी हून कल्याणात आलेली. MSW अशा नावाची पदवी असते हे तिच्यामुळे माहीत झालेलं. तर एकदा एका शिबिरात ती म्हणाली ‘बंदिनी’ हे गाणं तिला अजिबात पटत नाही. ‘स्त्री ला ‘हृदयी पान्हा; नयनी पाणी’ असं का म्हणून पहायचं नेहमी?’ असा तिचा सूर.
तर अशा काही घटनांनी मुलगी म्हणून मोठी होताना, बाईपण शिकताना माझ्या स्त्री म्हणून भूमिका आकार घेत गेल्या. प्रसंगी सोशीक, क्षमाशील होणं आणि दरच वेळी पडतं घेणं यात फरक करायला शिकलं पाहिजे. या शिकवणुकीतून असेल मात्र सोशीक नायिकेपेक्षा मुद्दयाचं बोलणाऱ्या, परखडपणे स्वतःचं मत मांडणाऱ्या सहनायिकेला मला ‘नाठाळ’ म्हणवत नाही. मालिकेतच नाही प्रत्यक्षात ही स्वमतासाठी stand घेणारी कुणीही स्त्री मला heroin च वाटते. सोपं नसतं ते!
सोशल मीडिया वर फिरणाऱ्या ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ सदृश posts... so called आदर्श mindset तयार करण्यासाठी पोषक आणि म्हणून मनाला जाचक! Homemaker असो वा working woman, प्रत्येकीचं अवकाश वेगळं आणि ती प्रत्येक superwoman ठरते. मग 'आम्हालाच कसं सगळं करावं लागतं', असा तक्रारीचा सूर लावत super powers वापरण्यात काय मजा!
आपण कोणत्या गोष्टीचा ‘उदो उदो’ करतो ह्यावर बरंच अवलंबून... रडण्याचा की लढण्याचा! Multitaskers म्हणून अष्टभुजा/दशभुजा देव्यांच्या प्रतिकांमध्ये आपण दिसतो तेव्हा ते आदरपूर्वक celebrate करायची जबाबदारी ही आपलीच.
सुपरमॅन त्याच्या supernatural powers बद्दल तक्रार करत रडायला लागला तर आपणही कीव करू न त्याची? मला तर नाही बाई आवडणार कुणी मला ‘बिचारी’ म्हंटलेलं. तुम्ही काय म्हणता बायांनो?
कळावे,
आनंदमयी
Very true
ReplyDeleteVery true
ReplyDeleteस्वतःला बिचारी म्हणवून घेण्यापेक्षा आपल्या womanhood चे challenges स्विकारीत ते enjoy करणे यातच खरी मजा आहे
ReplyDelete