दर्शन

 प्रिय,


‘दर्शन’ नाटकाच्या वेळी लेखक शाम मनोहर एका भेटीत म्हणाले होते, ‘एखादी कलाकृती आवडते म्हणजे तिच्यातलं सगळंच आवडलं पाहिजे असं नाही. अख्या नाटकात फक्त एक लयबद्ध गिरकीच लक्षात राहू शकते आणि ते ही नाटकाचं श्रेय ठरू शकतं.’ सांगितलेलं सगळं कळण्याइतकी प्रगल्भता नव्हती; मात्र त्या नंतर ‘दर्शन’च्याच एका प्रयोगात ‘गावातल्या पाणीवाल्या बाईच्या’ भूमिकेत ‘स्वतःच्या आईला पाहीलं’ म्हणून चक्क मला नमस्कार घालायला आलेल्या एका आजोबांच्या कृतीतून बराच अर्थ जुळला. त्यांना नाटकाशी जोडणारं काही असेल तर त्या भूमिकेची वेशभूषा आणि तिचा पाण्यासाठीचा struggle. या नव्या दृष्टिकोनानंतर काहीच ‘टाकाऊ’ नाही राहिलं. कोणतंही गाणं, कविता, पुस्तक, चित्रपट, विषय, अनुभव….काहीच!

कधी कशात काय ‘क्लिक’ होऊन जाईल नेम नाही. जसं चित्रपटाच्या बाबतीत एखादाच संवाद किंवा प्रसंग, अगदी expression / feel सुद्धा पुरेसा असतो आवडायला. ‘DDLJ’ केवळ शाहरुखचा... ‘पलट’ वाला सीन आवडतो; म्हणून अनेकदा पाहणारे असतीलच की ओळखीत. तसंच खूप आवडणाऱ्या गाण्यात एखादं कडवंच खरंतर प्रिय असतं. दर्जेदार लिखाण करणाऱ्या साहित्यिकांची ही मोजकीच विधानं (quotes) लोकप्रिय होतात, जी सहज क्लिक होतात. परिस्थिती/ मनस्थिति/ आवड आणि व्यक्तिपरत्वे काहीही ‘wow!’ वाटू शकतं. Relate होऊ शकतं.

मनोहरांच्या सांगण्यातला अर्थ उलगडत गेला तसं लक्षात आलं की, फक्त कलाकृती च्या बाबतीत नाही तर माणसांमध्ये सुद्धा असं काही शोधत असतो आपण, त्या त्या व्यक्तीसोबत स्वतःला जोडून ठेवण्यासाठी. दिसणं, हसणं, गांभीर्य वा विनोदाचं अंग, talent(s), स्वभाव, सोबतीतली सहजता.... असं दिसण्यापासून असण्यापर्यंत काहीही सापडू शकतं. जे जोडून ठेवतं आपल्याला सोबत. आणि एकदा गवसलेलं पुन्हा पुन्हा आठवून मनात ताजं ठेवता आलं की ‘टाकाऊ तून टिकाऊ’ कडे जाता येतं.

थोडक्यात काय ‘कुणासोबत चांगलं जमतं, म्हणजे तिच्यातलं सगळंच आवडलं पाहिजे असं नाही. एखादीच गोष्ट क्लिक होऊ शकते. जी टिकाऊ connection साठी निमित्त होते.’ आणि असाच गोतावळा वाढत जातो!

असायला हवं आपलं ही नाव कुठल्या तरी लिस्ट मध्ये असंच add झालेलं. काय म्हणता?

कळावे,
आनंदमयी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट