पिक्चर अभी बाकी है ...

 

प्रिय,

    माझी सखी गंमतीने म्हणते, ‘पिक्चरच्या शेवटी हीरो हिरोईनचं लग्न लागलं आणि ‘the end’ असं दिसलं (म्हणजे पिक्चर संपला) की वाटतं, खऱ्या आयुष्यात पण लग्नानंतर आयुष्य संपतंच जणू.’ अर्थात स्वतः त्यातून गेल्यावर नक्कीच लक्षात आलं असेल, पिक्चर अभी बाकी है!

     चित्रपटवेडातून माझीही एक धारणा तयार झाली, ती म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात संपूर्ण चित्रपटाएवढी नाट्यमय ताकद असू शकते. नाट्य (ड्रामा) ओतप्रोत भरलेलं असतं आयुष्यातल्या किरकोळ पासून critical situations मध्ये.

      बघा ना, एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन बाजी मारण्यापर्यंतचा प्रवास काही कमी रोमांचक नसतो. कुठल्या न कुठल्या स्पर्धेत अनुभवलेला असतो तसा रोमांच आपण. फक्त त्यावर लगेच script लिहीत नाही आपण.

     तसंच लग्न नामक सोहळा काही फक्त ‘राजश्री प्रॉडक्शन’ वाले नाही साजरा करत! आपणही कधी न कधी हीरो हिरोईन असतोच, खरेखुरे! शिवाय typical Romantic movie चा जीव पण तितकाच हो, real life नव्या नवलाई इतका!

   Real life विनोद म्हणाल तर, तसे किस्से रोजच्या जगण्यात घडतातच असं नाही. मात्र प्रासंगिक विनोद किंवा ब्लॅक कॉमेडी घडत राहते आसपास. केवळ नजर पारखी हवी, विनोद हेरणारी. त्यातले अर्ध्याहून अधिक प्रसंग तर स्वतःवर हसायला भाग पडणारे असतात. म्हणजे विनोदाचा पुरस्कार पण आपल्याकडेच!  

     Fantasy या प्रकारात ही मागे नाही जगणं. रोजच्या बातम्या नीट वाचल्या तर लक्षात येईल की, ‘ऐकावं ते नवल’ श्रेणीतल्या वास्तवातल्या घटना कल्पनेहून भन्नाट असतात.

     आईच्या उदरातून जन्म घेतो तेव्हाचा थरार स्वतः आपण तेव्हा अनुभवला नसला; तरी आपल्या मुलांच्या जन्मावेळी रीमेक होतोच त्याचाही. त्याचप्रमाणे ‘जातस्य ही ध्रुवो मृत्यू:’ म्हणजे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे, हे माहीत असूनही; त्याचा प्रत्यय घेताना होणाऱ्या यातना आणि त्यातून सावरणं हेही एक अपरिहार्य नाट्य!

       प्रेम, विरह, मैत्री, निव्वळ मस्ती, संकट, हरणं, जिंकणं, अपमान, आनंद, दुःख, कमावणं किंवा गमावणं या आणि अशा असंख्य अनुभवांमध्ये नाट्यमय आयुष्य सामवलेलं असतं. एका संपता दुसरं script हजरच असतं. एवढंच की त्यातल्या नाट्याची दखल घेत; चित्रपटकर्ते रसिकांची ‘दाद आणि पैसे’ दोन्ही कमावतात. आणि आपण अनुभव किंवा आठवण नावाने ते जपत असतो.

      या Real life नाट्याची कदर करून, प्रसंगांचे तुकडे जोडत series च्या स्वरूपात जर पाहायचं ठरवलं, तर आयुष्याचे किती तरी seasons जगता येतील. आणि निश्चितच प्रत्येक season आधी पेक्षा कितीतरी वेगळा आणि रोमांचक असेल. ज्यात पात्रं येत राहतील, आपलं आणि त्यांचं आयुष्य खुलवत राहतील आणि exit घेतील. आपण आपलं पात्र exit पर्यंत चांगलं वठवत राहायचं आणि सहकलाकारांच्या action वर जमेल तेवढं उत्तम react होत राहायचं. शेवटी सगळा give and take चा मामला! मग तो चित्रपट असो वा जगणं! काय म्हणता?

कळावे,

आनंदमयी

Comments

  1. खुपचं सुंदर . मनापासुन उत्तम रिऍक्ट होणं हे खर्च फार महत्वाच.

    ReplyDelete
  2. खुपचं सुंदर . मनापासुन उत्तम रिऍक्ट होणं हे खरच फार महत्वाच.

    ReplyDelete
  3. True आपली life आपला cinema आणि काही प्रमाणात script पण आपलीच जितके चांगले पात्र साकारता येईल तेवढे साकारायचे

    ReplyDelete
  4. क्या बात हैं सायली😊👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट