season 2

 प्रिय,

कोणत्याही गोष्टीची सवय अशी नकळत अंगवळणी पडते आणि इतकी चिकटून जाते की त्यात खंड पडता स्वतःला आणि ज्याना किंवा ज्यांच्यामुळे ती जगण्याचा भाग झाली त्यांनाही करमत नाही. वर्षभर आनंदमयीला  विराम दिला गेला आणि माझ्या ही जगण्याची एक सवय खंडित झाली. वेगळ्या वाटा चोखाळताना लेखणी रोज हातात असली तरी आनंदमयीचं समाधान देणारी सय बोचत राहिली. 

त्यात अधूनमधून प्रत्यक्ष भेटीत किंवा चॅट वरच्या virtual गप्पांमधून कुणी चौकशी केली आनंदमयीची की बरं सुद्धा वाटायचं. अर्थातच, आपल्याला जिव्हाळ्याची असणारी गोष्ट कुणाच्या स्मरणात आहे ही फार सुखावणारी गोष्ट! आणि म्हणून हुरूप देणारी. 

तसंही अभिव्यक्ति हा स्थायीभाव असणाऱ्यांना दीर्घकाळ express करण्यावाचून रोखणं त्यांना स्वतः लाही जमणं कठीण.  त्यामुळे एक संपूर्ण वर्ष विराम घेतल्यानंतर, आता थोडा work and personal life चा balance साधत पुनः आत्मानंदाकडे वळत आहे. वेळ मिळेल, जमेल, सुचेल तसं. 

हल्ली सिरीजचे चाहते झालेल्या आपल्याला सीजन वन आणि टू पासून अगदी सात आणि आठ, नऊ, दहा पर्यंत ची सवय झाली आहे. आता त्याच प्रथेला कायम ठेवून सुरू करते आहे आनंदमयी सीजन 2.

कारण कितीही…काहीही झालं तरी व्यक्त होणं ही उर्मी काही कमी होत नाही. तसं पाहता कोणतेही आवेग बांधून ठेवणं कधी जमलंच नाही मला. त्यामुळे पुन्हा एकदा येते आहे ‘भाव माझ्या मनातला’ तुमच्यासोबत share करायला. जो कदाचित माझ्या इतकाच तुमच्याही मनातला आहे. 


तोपर्यंत, 


कळावे,

आनंदमयी 


Comments

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट