गिफ्ट
प्रिय, लहान असताना आई किंवा पप्पा कोणाचाही वाढदिवस असला की त्यांनीच दिलेल्या पॉकेट मनीमधून (कितीही असला तरी त्यातून काटकसर करून वाचवलेला ) त्यांच्या साठी आम्ही गिफ्ट आणायचो. पैसे आणि समज दोन्हींच्या मानाने प्रेम जास्त असायचं त्यात अर्थातच. मग कधी पप्पा असा खर्च केला म्हणून थोडे रागवायचे. त्याला कारणही तसंच म्हणा, त्यांचं प्रेम! ‘तुम्हाला खर्चायला दिलेले पैसे परत माझ्याचवर कशाला खर्च करता’ असा एकूण सूर. मात्र अक्कल कमी असल्याने तेव्हा वाटायचं आपण प्रेमाने आणलं आणि त्यांना आवडलं नाही की काय!? मोठे होत गेलो तसे गिफ्ट करावं अशी माणसं वाढत गेली. वाढदिवस, friendship day, एखादी achievement वगैरे च्या निमित्ताने गिफ्ट देणं आणि घेणं वाढलं. मला आठवतं, दहावी पास झाले म्हणून गुड्डी ताई म्हणजे माझी मामे बहीण, माझ्यासाठी ड्रेस घेऊन आली होती खास! कुठे फिरायला गेल्यावर हमखास आपली माणसं आठवतात आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या जातात आपसूकच. काही निमित्त देखील खास खास होत जातात आणि गिफ्ट्स ची value वाढत राहते. जसं केवळ प्रियकर असताना नवरोबा ने दिलेलं गिफ्ट, जे अजूनही जपून वापरण्याकडे कल असतो! काळ ...